breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू, होर्डिंग हटवण्याचं काम सुरूच

मुंबई | मुंबईतील घाटकोपर परिसरात महाकाय लोखंडी जहिरात फलक कोसळल्याची घटना काल घडली. त्यात आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. १४० बाय १४० चौरस फुटांचा हा फलक क्षणार्धात कोसळल्याने जवळ असलेली वाहने आणि शंभरहून अधिक नागरिक त्याखाली सापडले. या दुर्घटनेत ७४ जण जखमी झाले आहेत. त्यामुळे एकूण पीडितांची संख्या ८८ झाली आहे.

पूर्व द्रुतगती मार्गावर छेडानगर परिसरात पेट्रोल पंपाजवळील फलक मुळाशी असलेले लोखंडी खांब मोडून जमिनीवर आदळला. या दुर्घटनेच्या ध्वनीचित्रफिती काही मिनिटांतच समाजमाध्यमांवर फिरू लागल्या. पाऊस पडत असल्यामुळे पेट्रोल पंपाच्या परिसरात अनेक वाहनचालक, पादचारी आडोशासाठी उभे होते. त्यांच्यावरच हा महाकाय फलक कोसळल्यामुळे अनेक जण गाडले गेले. हे दृश्य अतिशय भीषण होते.

हेही वाचा    –   नंदुरबारमध्ये सर्वाधिक, तर शिरुरमध्ये सर्वात कमी मतदान, महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यात दिवसभरात किती टक्के मतदान?

पोलीस, अग्निशमन दल, एनडीआरएफ, बीपीसीएल, महानगर गॅस आणि अदानी इलेक्ट्रिसिटी या प्राधिकरणांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. रात्री उशीरापर्यंत मदतकार्य सुरू होते. फलक लोखंडी असल्याने क्रेनशिवाय बाजूला करणे अथवा उचलणे शक्य नव्हते. त्यामुळे बराच वेळ मदतकार्य सुरूच होऊ शकले नाही. याच दरम्यान किरकोळ मार लागलेल्या दहा ते बारा जणांना पोलिसांनी तत्काळ राजावाडी रुग्णालयात दाखल केले. यावेळी दबलेले अनेकजण मदतीची याचना करत होते. मदतीसाठी होर्डींगच्या खालून येणारे आर्त आवाज हेलावून टाकणारे होते.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. तसंच, जखमींच्या उपचारांचा खर्च सरकार करणार असल्याचंही ते म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button